आठ, आठ, लोक मरत असतील तर सद्गुरु संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही; अमोल मिटकारी यांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Apr 17, 2023 | 8:34 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. त्यांनी, सरकारवर निशाना साधताना, महाराष्ट्र सरकारने या सोहळ्यासाठी इतका पैसा खर्च केला. मग लोकांची व्यवस्था का करता आली नाही

नागपूर : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात उष्मघातामुळे श्रीसदस्यांना त्रास झाला आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे 11 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. तर 24 जणांवर नवी मुंबईच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. त्यांनी, सरकारवर निशाना साधताना, महाराष्ट्र सरकारने या सोहळ्यासाठी इतका पैसा खर्च केला. मग लोकांची व्यवस्था का करता आली नाही. तर केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह येणाऱ्या बड्या लोकांना व्हीआयपी सुविधा होती मात्र जो भक्त सांप्रदाय लाखोंच्या तादांमध्ये तिथे येणार आहे त्यांना कळलं नाही का? असा सवाल केला आहे. तर याबाबत आपण राज्यपालांकडे विनंती करणारे पत्र लिहणार असून सरकारवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 17, 2023 08:34 AM