प्रतापगड हेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं नव कार्यालय; पण उद्धाटनाआधीच असं काय झालं की कार्यकर्ते….
राष्ट्रवादी आमचीच असा दावा अजित पवार यांनी केल्याने त्यांचे आणि शरद पवार यांचे समर्थक एकमेकांच्या समोर आता येत आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यलयावर ताबा घेण्यावर वाद झाल्यानंतर मुंबईतही तसा प्रकार समोर आला आहे.
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर त्याचे परिणाम आता राज्यात दिसू लागले आहेत. राष्ट्रवादी आमचीच असा दावा अजित पवार यांनी केल्याने त्यांचे आणि शरद पवार यांचे समर्थक एकमेकांच्या समोर आता येत आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यलयावर ताबा घेण्यावर वाद झाल्यानंतर मुंबईतही तसा प्रकार समोर आला आहे. आणि तो ही उद्धाटनाच्या आधी. त्यामुळे अजित पवार कि शरद पवार यांच्यात कोण पॉवर फुल यावरून रंगलेला वाद आता कार्यालयांपर्यंत येऊन पोहचला आहे. अजित पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय मंत्रालयसमोरील प्रतापगड बंगला घोषित केला. त्याच्या किल्ल्या ताब्यात घेण्यावरून आता कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे.
Published on: Jul 04, 2023 04:08 PM
Latest Videos