Raosaheb Danve : अर्जुन खोतकर यांनी चांगला निर्णय घेतला, रावसाहेब दानवे यांची खोतकर हे शिंदे गटात गेल्यानंतरची प्रतिक्रिया
राज्यात शिवसेना(एकनाथ शिंदे) व भाजप यांचं सरकार आहे. त्यामुळं आम्ही त्यांचं स्वागत करतो. जालन्यामध्ये जुनी शिवसेना सक्रिय झाली. शिंदे यांच्या शिवसेनेनं जालन्यात सुरुवात केली, असं मला वाटतं. ही चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई : अर्जुन खोतकर यांनी चांगला निर्णय घेतला. आजपासून आमचं राजकीय वैर संपलं. खोतकर शिंदे गटात गेल्यानंतर राजसाहेब दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिला. जुनी शिवसेना जिल्ह्यात सक्रिय झाली, असं म्हणायला वाव आहे. परंतु, राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही, असंही रावसाहेब दानवे म्हणाले. खोतकर यांनी पत्रकार परिषद घेऊन समर्थनाची घोषणा केली. आज त्यांनी शिंदे यांचं समर्थन जाहीर केलं. त्यांचं स्वागत करत असल्याचं दानवे म्हणाले. राज्यात शिवसेना(एकनाथ शिंदे) व भाजप यांचं सरकार आहे. त्यामुळं आम्ही त्यांचं स्वागत करतो. जालन्यामध्ये जुनी शिवसेना सक्रिय झाली. शिंदे यांच्या शिवसेनेनं जालन्यात सुरुवात केली, असं मला वाटतं. ही चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Published on: Jul 30, 2022 05:58 PM
Latest Videos