जमिनीच्या वादातून तिघांवर सशस्त्र हल्ला

जमिनीच्या वादातून तिघांवर सशस्त्र हल्ला

| Updated on: Mar 29, 2022 | 11:53 AM

मंगळवेढा तालुक्यातील माराेळी येथील सांगलीच्या (Sangli) जतच्या जाडरबाेबलाद येथे वनक्षेत्रात  दाेघा भावांसह तिघांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला.

मंगळवेढा तालुक्यातील माराेळी येथील सांगलीच्या (Sangli) जतच्या जाडरबाेबलाद येथे वनक्षेत्रात  दाेघा भावांसह तिघांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला. तलवारीने वार करीत हात-पाय ताेडण्यात आले. जंगलात (Jungle) दबा धरून बसलेल्या हल्लेखाेरांनी भावकीतील अंतर्गत वाद व शेतजमिनीवरून सुरू असलेल्या संघर्षातून हा हल्ला केल्याचे समाेर येत आहे. मंगळवेढा (Mangalvedha) तालुक्यातील माराेळी व जत तालुक्यातील जाडरबाेबलाद दरम्यान वन विभागाची जागा आहे. जंगल असल्याने नेहमीच हा परिसर निर्जन असताे. जाडरबाेबलाद येथील बरुर भावकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. रविवारी विठ्ठल बरूर, दयानंद बरूर व महादेव बरूर हे तिघे एकाच दुचाकींवरून जाडरबोबलाद जवळच असणाऱ्या नंदूर येथे एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेले हाेते.अंत्यविधी आटाेपून परत येत असताना वनक्षेत्रात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांना अडवून तलवारीने हल्ला चढविला.
Published on: Mar 29, 2022 11:53 AM