मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कलम 144 लागू, जाणून घ्या सविस्तर माहिती
नरेंद्र मोदी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीत मोदी सरकारच्या शपथविधीची तयारी जोरात सुरू झाली आहे.संपूर्ण दिल्लीत नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आला आहे. दिल्लीत 9 आणि 10 जून रोजी कलम 144 लागू राहणार आहे. राष्ट्रपती भवनाभोवती एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर्स तैनात करण्यात येणार आहेत.
PM Narendra Modi : दिल्लीत मोदी सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. उद्या म्हणजेच रविवारी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या अनुषंगाने राष्ट्रीय राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीला नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आलं आहे. ड्रोन उडवण्यास आणि पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्यात आली आहे. 9 आणि 10 जून रोजी दिल्लीत कलम 144 लागू होणार आहे. राष्ट्रपती भवनाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
Published on: Jun 08, 2024 12:10 PM
Latest Videos