दिल्लीत अचानक 144 कलम लागू, अरविंद केजरीवाल यांचा असा काय गुन्हा?

दिल्लीत अचानक 144 कलम लागू, अरविंद केजरीवाल यांचा असा काय गुन्हा?

| Updated on: Nov 02, 2023 | 4:42 PM

नवी दिल्लीमध्ये पोलिसांनी 144 कलम लागू केलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने नोटीस पाठविली आहे. तर, राजकीय हेतूने ही नोटीस पाठविल्याचा आरोप केजरीवाल यांनी केलाय. ही नोटीस परत घ्यावी असेही त्यांनी म्हटलंय.

नवी दिल्ली | 2 नोव्हेंबर 2023 : दिल्लीत झालेल्या कथित दारू घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. ते जेलमध्ये आहेत. अशातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना याच घोटाळा प्रकरणी ईडीने समन्स पाठविले आहे. कथित दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने यापूर्वीच चौकशी केली आहे. मात्र, ईडीने समन्स पाठविल्यानंतर केजरीवाल हे ईडी कार्यालयात हजेरी लावणार आहेत. यावेळी केजरीवाल यांच्याकडून मोठे शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दिल्लीत 144 कलम लागू केलंय. केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, कुणी शक्ती प्रदर्शन केल्यास तत्काळ अटक करा असे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत. दरम्यान, केजरीवाल यांनी मला आलेली नोटीस म्हणजे बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे असे म्हटले आहे. भाजपच्या सांगण्यावरून मला नोटीस पाठविण्यात आली. 4 राज्यात प्रचाराला जाऊ नये म्हणून मला नोटीस पाठविण्यात आली आहे. ईडीने नोटीस परत घ्यावी असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Published on: Nov 02, 2023 04:34 PM