मुंबई : आज शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मात्र यावेळी सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. तसेच निलेश राणे यांनी मोफत पेट्रोल वाटण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर टीकासुद्धा केली. त्यानंतर शिवसेना नेते अरविंद सांवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी असल्या विचारांवर कुठलेही भाष्य करु इच्छित नाही. आज अतिशय चांगला दिवस आहे. मी यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, असे सावंत म्हणाले.