नितेश राणे सरड्यासारखे रंग बदलणारे लाचार, ठाकरे गटाची टीका

“नितेश राणे सरड्यासारखे रंग बदलणारे लाचार”, ठाकरे गटाची टीका

| Updated on: Jul 09, 2023 | 5:42 PM

उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीमध्ये बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनर्सवर उद्धव ठाकरे यांचा ‘धर्माभिमानी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यवतमाळ: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यवतमाळ दौऱ्यावर असताना पोहरादेवीमध्ये उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. या स्वागताच्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनर्सवर उद्धव ठाकरे यांचा ‘धर्माभिमानी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे यांचा नेमका धर्म कुठला. कारण हिंदू धर्माचा ते द्वेष करतात. त्यांचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे. उद्धव ठाकरेंनी सांगावं की त्यांच्या शरीरात भगवं रक्त आहे का?,” अस नितेश राणे म्हणाले. यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “लाचारांनी काय प्रश्न विचारायचे? सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांना अभिमान नावाची गोष्ट असते का? स्वाभिमान बाजारात विकलेल्या लोकांबद्दल काय बोलावं.”

Published on: Jul 09, 2023 05:42 PM