“शिवरायांना गद्दारी मान्य नव्हती”, अरविंद सावंत यांनी टोचले मुख्यमंत्री शिंदेंचे कान
शिवराज्याभिषेक दिनाच्यानिमित्ताने ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत छत्रपती शिवाजी महाराज टार्मिनल येथे उपस्थित होते. त्यांनी शिवाजी महाराजांना हार घालून केले अभिवादन केले. यावेळी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका ही केली आहे.
मुंबई : शिवराज्याभिषेक दिनाच्यानिमित्ताने ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत छत्रपती शिवाजी महाराज टार्मिनल येथे उपस्थित होते. त्यांनी शिवाजी महाराजांना हार घालून केले अभिवादन केले. यावेळी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका ही केली आहे. “आज 350 वा शिवराज्याभिषेक दिन आहे. देशाला दिशा देणारा हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आहे. काल परवा आपण नवीन राज्याभिषेक पाहिला होता त्यामध्ये आणि यामध्ये फरक आहे.शिवरायांना त्यांच्या रायतेवर झालेला अन्याय मान्य नव्हता. स्वराज्याची संकल्पना साकार करणारे एकच राजे शिवछत्रपती.जे दोन दिवसापूर्वी नतमस्तक झाले त्यांना नैतिक अधिकार आहे का?शिवरायांना गद्दारी मान्य नव्हती. बाळासाहेब ठाकरे यांनी या विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव द्यायला लावले. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून इथे शिवाजी महारांजाचा पुतळा उभा राहिला.त्यामुळे मूळ संकल्पना आहे त्याला धरून कारभार करणारी कोण आहेत त्यांनी विचार केला पाहिजे. फक्त शोभेला नत मस्तक होऊ नका, आज कारभार नाहीतर फक्त भ्रष्टाचार आहे”, असं अरविंद सावतं म्हणाले.