“शिंदे-फडणवीस यांना कर्माची फळ भोगावी लागतील”, ठाकरे गटाचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील शिंदेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये सातत्याने वादाच्या बातम्या येत आहेत. भाजप पदाधिकारी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा वाद आणखी पेटला आहे. कल्याण लोकसभा जागेवर भाजपने आपला दावा केला आहे. यानिमित्ताने काल शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप-शिवसेनेत समन्वय राखण्यासाठी समिती नेमण्यात आली.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील शिंदेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये सातत्याने वादाच्या बातम्या येत आहेत. भाजप पदाधिकारी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा वाद आणखी पेटला आहे. कल्याण लोकसभा जागेवर भाजपने आपला दावा केला आहे. यानिमित्ताने काल शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप-शिवसेनेत समन्वय राखण्यासाठी समिती नेमण्यात आली. दरम्यान आता शिवसेनेची एक जाहिरातही आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आता उशिर झाला आहे. काही होणार नाही. यांना आता त्यांच्या कर्माची फळ भोगावी लागतील. त्यांनी कितीही समन्वय समित्या तयार केला तरी त्याचा काही फायदा होणार नाही.”
Published on: Jun 13, 2023 04:06 PM
Latest Videos