Video | मुंबईची आर्थिक राजधानी ही प्रतिमा पुसायचा प्रयत्न, अरविंद सावंत यांची सरकारवर टीका

Video | मुंबईची आर्थिक राजधानी ही प्रतिमा पुसायचा प्रयत्न, अरविंद सावंत यांची सरकारवर टीका

| Updated on: Jan 01, 2024 | 7:58 PM

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठीच येथील प्रकल्प गुजरातला पळविले जात आहेत. गुजरातचा विकास करण्यास विरोध नाही. परंतू त्यासाठी महाराष्ट्राला का ओरबाडले जात आहे असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे. हे सरकार जाहिरातीवरच पैसा खर्च करीत असून सर्वसामान्याच्या पैशांची लूट केली जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.

मुंबई | 1 जानेवारी 2023 : केंद्र सरकारने मुंबईची आर्थिक राजधानी ही प्रतिमा पुसायचा प्रयत्न चालविला आहे. इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हीस सेंटर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नेमण्याची गरज असताना ते सुरत गिफ्ट सिटीच्या नावाने नेमण्यात आले आहे. या सरकारने नागरिकांच्या पैशांची अक्षरश: लूट चालविली आहे. सरकार तुमच्या दारीवर किती पैसा खर्च केला जात आहे? आता राज्य सरकार केलेल्या कामाची जाहीरात करण्यासाठी एक कोटी एम्बेसेडर नेमणार आहे. ईडीने या एक कोटी एम्बेसेडरना पगार कोण देणार आहे? याची चौकशी करावी अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. या सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यामुळे दीड ते पावणे दोन वर्षे झाली तरी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक घेतलेली नाही. राज्यातील अन्य महानगर पालिकेच्या निवडणूका घेतलेल्या नाहीत. इतकच काय आदित्य ठाकरेंना घाबरुन साध्या सिनेटच्या निवडणूका घेतलेल्या नाहीत अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. शिवसेनेतून गेलेल्या गद्दारांना तिकीटे मिळणार नाहीत आणि मिळाली तरी त्यांना कमळावर निवडणूका लढाव्या लागतील असा दावा सावंत यांनी केला आहे.

Published on: Jan 01, 2024 07:51 PM