सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा; अरविंद सावंत यांच्याकडून अपेक्षा व्यक्त

सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा; अरविंद सावंत यांच्याकडून अपेक्षा व्यक्त

| Updated on: Mar 14, 2023 | 1:28 PM

Arvind Sawant : सत्ता संघर्षावर सुनावणी सुरु असताना अरविंद सावंत यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी राज्यातील सत्तासंघर्षाबाबत आशावाद व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहेत, असं अरविंद सावंत म्हणालेत. शिंदेगटातील आमदारांनी 10 व्या शेड्युलचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे आमदार अपात्र व्हायलायच हवेत. कोर्टाचा निकाल न्यायच्या बाजूने लागावा एवढीच अपेक्षा आहे. आम्हाला वाटतं की सर्वोच्च न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल, असं सावंत म्हणालेत. उद्धव ठाकरेंनी नैतिकता म्हणून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र आम्ही न्यायाची अपेक्षा करतोय. निकाल हा न्यायाच्या बाजूने लागायला हवा, असं अरविंद सावंत म्हणालेत.