निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर; ठाकरेगटाची अर्थसंकल्पावर जोरदार टीका
ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य केलंय. पाहा ते काय म्हणालेत...
नवी दिल्ली : ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य केलंय. केंद्रीय अर्थसंकल्प हा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सादर करण्यात आला. जुन्याच योजनांना नवीन नावं देण्यात आली आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन एससी, एसटी, ओबीसींसाठीच्या योजनांचा दोन तीन वेळा उल्लेख केला. कररचनेत थोडा बदल केलाय त्यानं थोडा दिलासा मिळलाय. पण सर्वसाधारणपणे पाहता बजेटमध्ये फारसं दिलासादायक काहीही नाही, असं अरविंद सावंत म्हणालेत. हा महापालिकेचा अर्थसंकल्प आहे की केंद्र सरकारचा?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
Published on: Feb 01, 2023 03:16 PM
Latest Videos