अमित शाह यांच्या ‘त्या’ चार प्रश्नांवर ठाकरे गटाच्या नेत्याचं उत्तर; म्हणाला, “राम मंदिर कायदा…”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नांदेडमध्ये जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांना चार प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. या प्रश्नांवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी उत्तर दिलं आहे.
यवतमाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नांदेडमध्ये जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांना चार प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. या प्रश्नांवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी उत्तर दिलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक मुद्यांसोबतच पाकिस्तानसोबत युद्ध करून मूळ मुद्यांपासून भरकटविण्याचा देखील प्रयोग होईल अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली. यवतमाळच्या दिग्रस येथे शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. शाहांच्या प्रश्नांवर बोलताना राममंदिर कायदा करून बनविले नाही तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बनत आहे, तर 370 कलम हटविण्याचे शिवसेनेने स्वागतच केले. मात्र त्यानंतरही तिथली परिस्थिती बदलली नाही आणि मुस्लिम धर्म म्हणून आरक्षण भेटू शकत नाही, मात्र मुस्लिम समाजात आताही आरक्षण आहे अशी उत्तरं सावंत यांनी दिली.