Arvind Sawant : गद्दारांच्या हल्ल्यातही शिवसैनिक तटस्थ, नेतेपदी निवड झाल्यानंतर सावंताचे टीकास्त्र
शिवसेनेबरोबर गद्दारी केलेल्यांचे काय झाले हे त्यांनी पहावे असा सल्लाही सावंत यांनी दिला आहे. हे सर्व असले ती शिवसैनिक हा मात्र, पक्षप्रमुख ठाकरेंबरोबर तटस्थ आहे. त्याच्या विचारामध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे एक नवी सुरवात करण्याची संधी ही सर्वांसमोरच आहे. शिवसेनेचा इतिहास येथेच घडला आहे. शिवसेनेच्या वाटचालीसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद असणे गरजेचे आहेत. तेच आशीर्वाद घेण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल झाल्याचे सावंत यांनी सांगितले.
मुंबई : (Shivsena Party)शिवसेनेच्या नेतेपदी आता भास्कर जाधव आणि (Arvind Sawant) अरविंद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. नेतेपदी वर्णी लागल्यानंतर अरविंद सावंत यांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली आहे. निवड होताच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे त्यांनी आशीर्वाद तर घेतलेच पण आज बाळासाहेब ठाकरे हे पहायला असायला पाहिजे होते असेही ते म्हणाले. विरोधक आणि गद्दारांकडून पक्षप्रमुख (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी कोंडीत पकडण्याचा डाव आहे. पण शिवसेनेबरोबर गद्दारी केलेल्यांचे काय झाले हे त्यांनी पहावे असा सल्लाही सावंत यांनी दिला आहे. हे सर्व असले ती शिवसैनिक हा मात्र, पक्षप्रमुख ठाकरेंबरोबर तटस्थ आहे. त्याच्या विचारामध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे एक नवी सुरवात करण्याची संधी ही सर्वांसमोरच आहे. शिवसेनेचा इतिहास येथेच घडला आहे. शिवसेनेच्या वाटचालीसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद असणे गरजेचे आहेत. तेच आशीर्वाद घेण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल झाल्याचे सावंत यांनी सांगितले.