विदर्भाचे नंदनवन असणाऱ्या चिखलदऱ्यात वीकेंडला पर्यटकांची पावले

विदर्भाचे नंदनवन असणाऱ्या चिखलदऱ्यात वीकेंडला पर्यटकांची पावले

| Updated on: Jul 16, 2023 | 1:26 PM

हे ठिकाण शहरापासून दूर आणि अतिशय शांत आहे. येथील हवामान देखील इतके आल्हाददायक आहे की येथे दररोज हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येतात.

अमरावती | 16 जुलै 2013 : जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर महाराष्ट्रातील चिखलदरा हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळ ठरू शकते. हे ठिकाण शहरापासून दूर आणि अतिशय शांत आहे. येथील हवामान देखील इतके आल्हाददायक आहे की येथे दररोज हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येतात. हे ठिकाण सुंदर तलाव, धार्मिक स्थळे आणि प्राचीन इतिहासासाठी ओळखले जाणारे असून सध्या येथे पर्यटकांची तोबा गर्दी होताना दिसत आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून चिखलदराची ओळख. तर सध्या पावसाळा असल्याने दमदार पावसामुळे चिखलदराच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. डोंगर दर्यातील झाडांची पान हिरवीगार झाली आहे. पहाटेपासूनच चिखलदऱ्यात पावसाच्या सरी कोसळताहेत. घनदाट धूक्यातून पर्यटकांची पावले, सध्या चिखलदराकडे वळताना दिसत आहेत. निसर्गाचा अद्भुत आनंद घेण्यासाठी वीकेंडला पर्यटकांची पावले चिखलदराकडे वळताना दिसत आहेत.

Published on: Jul 16, 2023 01:26 PM