‘दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या, देशातील रेकॉर्ड’; रासप नेते महादेव जानकर यांची सरकारवर टीका

‘दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या, देशातील रेकॉर्ड’; रासप नेते महादेव जानकर यांची सरकारवर टीका

| Updated on: Jul 25, 2023 | 12:44 PM

मात्र त्यांच्या सरकारच्या काळातच मराठवाड्यात तब्बल 483 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर एकट्या बीडमध्ये 100 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र थांबत नसून किमान रोज तीन शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहेत.

मुंबई, 25 जुलै 2023 | एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करणार अशी भिष्म प्रतिज्ञा घेतली होती. मात्र त्यांच्या सरकारच्या काळातच मराठवाड्यात तब्बल 483 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर एकट्या बीडमध्ये 100 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र थांबत नसून किमान रोज तीन शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहेत. त्यावरून आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल केली जात आहे. यावरून रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी सरकारला सल्ला देताना हल्ला ही केला आहे. यावेळी जानकर यांनी, सध्या मराठवाडा निर्मितीचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. पण याच वर्षात दिवसा तीन शेतकरी आत्महत्या होण ही दुर्दैवी गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर आता राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार असून आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती असून त्यांनी मराठवाड्यात इरिगेशन स्कीम चांगली राबवली पाहिजे असा सल्ला दिला आहे. जर मराठवाड्यात इरिगेशन स्कीम चांगली राबवली गेली तर शेतकऱ्यांचा मागासलेपणा कमी होईल असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 25, 2023 12:44 PM