शेतकऱ्याची व्यथा, भाव घसरल्याने एक एकरावरील कोथिंबीरीवर शेतकऱ्याने काय केलं पाहा....

शेतकऱ्याची व्यथा, भाव घसरल्याने एक एकरावरील कोथिंबीरीवर शेतकऱ्याने काय केलं पाहा….

| Updated on: Aug 06, 2023 | 9:10 AM

गेल्या काही दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यावर आता दुबार पेरणीचे संकंट आलं आहे. तर ज्यांच्या शेतात जी नगदी पीकं आहेत. त्यांच्यातून उत्पादनाचा खर्च ही निघताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून अनेक ठिकाणी उभ्या पिकावर ट्रक्टर फिरवला जात आहे. तर कुठं जनावरे सोडली जात आहेत.

लातूर, 06 ऑगस्ट 2013 | सध्या शेतकऱ्याच्या पदरात काही पडताना दिसत नाही. पिकासाठी केलेला खर्चही निघताना दिसत नाही. गेल्या काही दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यावर आता दुबार पेरणीचे संकंट आलं आहे. तर ज्यांच्या शेतात जी नगदी पीकं आहेत. त्यांच्यातून उत्पादनाचा खर्च ही निघताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून अनेक ठिकाणी उभ्या पिकावर ट्रक्टर फिरवला जात आहे. तर कुठं जनावरे सोडली जात आहेत. लातूर जिल्ह्यातील असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून शेतकऱ्याने एक एकराच्या कोथंबिरीवर ट्रक्टर फिरवला आहे. त्यामुळे अनेक जन सध्या हळहळ व्यक्त करत आहेत. कोथंबिरीचे भाव घसरल्याने लातूर जिल्ह्यातल्या कुमठा येथील शेतकऱ्याने कोथंबिरीवर ट्रॅक्टर फिरवला आहे. गेल्याच महिन्यात कोथंबिरीला चांगला भाव होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला. मात्र सध्या कोथंबिरीला लागवड आणि वाहतुकीचा खर्च निघेल एवढाही भाव मिळत नाही. कोथंबिरीच्या एका कॅरेटला सध्या पन्नास रुपये मिळतायत, त्यामुळे कोथंबिरी बाजारात नेण्यापेक्षा काढून टाकलेली बरी असा विचार शेतकरी करीत आहेत. उदगीर तालुक्यातल्या कुमठा येथील शेतकरी अतुल केंद्रे यांनी देखील भाव घसरल्याने आपल्या एक एकरावरील कोथिंबीरीवर ट्रॅक्टर फिरवला… पाहा हा शेतकऱ्याची व्यथा सांगणारा व्हिडिओ

Published on: Aug 06, 2023 09:10 AM