कोल्हापूरच्या अंबाबाईची सुरक्षेची जाबाबदारी कोणाकडे?; सुरक्षा रक्षकांची कोर्टात धाव, ४७ सुरक्षा रक्षांच काय?
दोन दिवसांपुर्वी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील सुरक्षा यंत्रणा हायटेक करण्याच्या सूचना दहशतवाद विरोधी पथकाने दिल्या होत्या. यावेळी दहशतवाद विरोधी पथकाने देवस्थान समितीला सूचना करताना काही गोष्टी सांगितल्या होत्या
कोल्हापूर : साडे तिन शक्तिपीठांपैकी एक असणारे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न आता न्यायालयात गेला आहे. दोन दिवसांपुर्वी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील सुरक्षा यंत्रणा हायटेक करण्याच्या सूचना दहशतवाद विरोधी पथकाने दिल्या होत्या. यावेळी दहशतवाद विरोधी पथकाने देवस्थान समितीला सूचना करताना काही गोष्टी सांगितल्या होत्या. या सूचना पथकाने मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर केल्या होत्या. त्यानंतर हायटेक सुरक्षा यंत्रणेबरोबरच अंबाबाई मंदिराला रात्री देखील सुरक्षा देण्यात आळी आहे. यावरून आता नवा वाद समोर आला आहे. जिल्हा सुरक्षा मंडळाच्या सुरक्षारक्षकांनी याच्या विरोधात थेट न्यायालयात धाव घेतली आहे. तर आता मंदिराची सुरक्षा ही राज्य सुरक्षा मंडळाकडे गेल्याने जिल्हा सुरक्षा मंडळाच्या ४७ सुरक्षारक्षकांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. त्यामुळे मंडळातील या रक्षकांनी आता कोर्टात धाव घेतली आहे.