कांद्यानं रडरडवलं! आता ग्राहकांच्या डोळ्यात आणणार पाणी? भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उचललं ‘हे’ पाऊल
कांद्याला उत्पादित करण्यासाठी साधारण 13 रुपये प्रतिकिलो खर्च येतो. किमान पंधरा रुपये भाव भेटला पाहिजे. मात्र तसं होत नाही. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झालं. त्याचबरोबर आता पुन्हा कांद्याचे भाव कमी झाले आहेत.
धुळे : कांद्याला दर मिळत नसल्याने धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. भाव नसल्याने त्याने आपला कांदा शेतात चाळीमध्ये साठवून ठेवला आहे. शेतकऱ्यांना कांदा लागवड परवडत नाही. कांद्याला उत्पादित करण्यासाठी साधारण 13 रुपये प्रतिकिलो खर्च येतो. किमान पंधरा रुपये भाव भेटला पाहिजे. मात्र तसं होत नाही. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झालं. त्याचबरोबर आता पुन्हा कांद्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादकला दुहेरी आर्थिक मार बसत आहे. कांदा विकण्यासाठी गेल्यास बाजार समिती बंद आहे. बाजार समिती बंद असल्याने कांदा विक्री होत नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. तोंडावर खरीप हंगाम आला असून, खरीपासाठी पैसे लागणार आहेत. मात्र कांदाच विक्री होत नाही. त्यासाठी तो कांदा चाळीमध्ये साठवणूक करून ठेवला आहे. साठवलेला कांदा उन्हामुळे खराब होतो आहे. त्यामुळे यावर सरकारने उपाययोजना करावी अशी अपेक्षा या भागातील शेतकरी व्यक्त करत आहे.