सांगा शिकायचं कसं? ‘या’ जिल्ह्यात शाळा चक्क भरतात कुडाच्या झोपडीत
महाराष्ट्रात डिजिटल शाळेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार होत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील ग्रामिण भागासह शहरी भागातील शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागत आहे.
धुळे, 03 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्रात डिजिटल शाळेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार होत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील ग्रामिण भागासह शहरी भागातील शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागत आहे. मात्र धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अनेर अभयारण्य व वनक्षेत्रातील तब्बल १२ जिल्हा परिषदेच्या शाळा या चक्क कुडाच्या झोपडीत भरत आहेत. विशेष म्हणजे शिक्षण विभाग एकीकडे जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल झाल्याचा दावा करत आहे. मात्र दुसरीकडे शिक्षणाची आणि शाळांची ही दुरावसस्था आहे. गेल्या २० वर्षापासून या शाळांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. शैक्षणिक क्षेत्रात शिरपूर शहराचे सर्वत्र नाव लौकिक असतांना येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था मात्र बिकट अवस्थेत आहे. येथे जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला मंजूरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना झोपडीच्या वर्गातच शिक्षण घ्यावे लागत आहे. या भागामध्ये वनविभागाने परवानगी द्यावी, तसेच चांगल्या शाळा उभारण्यात यावा अशी मागणी स्थानिक पालकांनी केली आहे.

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न

'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप

'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज

सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
