Aaditya Thackeray : वेळ निघून गेल्यावर त्यांना आठवेल राज्याचे झालेले नुकसान..! आदित्य ठाकरेंचा निशाणा कुणावर?

Aaditya Thackeray : वेळ निघून गेल्यावर त्यांना आठवेल राज्याचे झालेले नुकसान..! आदित्य ठाकरेंचा निशाणा कुणावर?

| Updated on: Sep 16, 2022 | 9:41 PM

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि गुजरातच्या हितासाठीच हा निर्णय घेतल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. आता एक प्रकल्प गेला आहे पण राज्यातून आणखी दोन प्रकल्प इतरत्र जात आहेत. वेळ निघून गेल्यावरच हे सरकारच्या लक्षात येईल असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

मुंबई :  (Vedanta Project) वेदांता प्रकल्पावरुन राज्याचे राजकारण हे तापले आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपानंतर वेदांताचा प्रकल्प गुजरातला कसा गेला? याबाबत सर्वकाही समोर आले आहे. आता केवळ एक प्रकल्प हातून गेला आहे. पण असे दोन प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून जात आहेत. याची आठवण राज्य सरकारला होईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल असा आरोप (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्री गणेत्सोवात व्यस्त असतानाच वेदांता हा कोट्यावधीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. तो केवळ एक प्रकल्प नव्हता तर त्या माध्यमातून अनेक बेरोजगारांच्या हातालाही काम मिळणार होते. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि गुजरातच्या हितासाठीच हा निर्णय घेतल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. आता एक प्रकल्प गेला आहे पण राज्यातून आणखी दोन प्रकल्प इतरत्र जात आहेत. वेळ निघून गेल्यावरच हे सरकारच्या लक्षात येईल असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. राज्य सरकारमधील आमदारांच्या हातूनच हे घडत आहे. पण आता ते लक्षात येत नसले तरी भविष्यात याची प्रचिती राज्य सरकारला होईल असेही ठाकरे म्हणाले आहेत.

Published on: Sep 16, 2022 09:41 PM