Ashadhi Ekadashi Vari 2023 : आषाढी यात्रेच्या आधीच पंढरपूरात विघ्न? पत्रा शेडवरून मतमतांतर
यंदा 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे. एकादशीच्या निमित्ताने वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येतात. त्यासाठी संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. तर तब्बल 17 दिवसांच्या पायवारीनंतर ही पालखी आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी 28 जून 2023 रोजी पंढरपुरात प्रवेश करेल.
पंढरपूर / सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त राज्यासह संपूर्ण देशभरातून वारकरी मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होत असतात. यंदा 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे. एकादशीच्या निमित्ताने वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येतात. त्यासाठी संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. तर तब्बल 17 दिवसांच्या पायवारीनंतर ही पालखी आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी 28 जून 2023 रोजी पंढरपुरात प्रवेश करेल. मात्र याच्याआधीच आता येथे वाद होताना दिसत आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. विठ्ठल दर्शनाची रांग मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर जात असते. तर सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच असल्याने येथे भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून मंदिर परिसरात पत्राशेड टाकण्यात येणार आहे. याची घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मात्र आता मंदिर परिसरातील पत्रा शेड बाबत मतमतांतरे समोर येऊ लागली आहेत. काहींनी या पत्रा शेडचे स्वागत केले आहे. तर काहींनी उष्णता व आपत्कालीन परिस्थितीवरून या पत्राशेडला विरोध केला आहे.