“विदर्भातील ‘नानागिरी’ संपवणार”, भाजप प्रवेशानंतर आशिष देशमुखांचा नाना पटोलेंवर निशाणा
काँग्रेसमधून निलंबन झाल्यानंतर आशिष देशमुख यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी 2024 ला लोकसभा, विधानसभा लढवणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे.
नागपूर : काँग्रेसमधून निलंबन झाल्यानंतर आशिष देशमुख यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी 2024 ला लोकसभा, विधानसभा लढवणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे. मी आमदाराकीसाठी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. मी येणारी विधानसभा व लोकसभा निवडणूकही लढणार नाही. या निवडणुकांमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करेल. ओबीसीच्या कल्याणासाठी मी काम करेन. विदर्भाच्या व्यापक विकासाठी मी काम करेन. या निमित्ताने काटोलातली काका गिरी, सावनेर मधील दादागिरी, विदर्भातील नानागिरी मी संपवणार,असं देशमुख म्हणाले.
Published on: Jun 18, 2023 02:40 PM
Latest Videos