रविकांत तुपकर भाजपमध्ये जाणार? ‘या’ बड्या नेत्याने दिली थेट ऑफर
रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर दावा करू शकतात, अशी चर्चा सुरु असतानाच भाजपकडून रविकांत तुपकर यांना पक्ष प्रवेशाची ऑफर मिळाली आहे.
मुंबई, 4 ऑगस्ट 2023 | शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. रविकांत तुपकर यांनी वेळोवेळी पक्ष नेतृत्वार टीका केली आहे. रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर दावा करू शकतात, अशी चर्चा सुरु असतानाच भाजपकडून रविकांत तुपकर यांना पक्ष प्रवेशाची ऑफर मिळाली आहे. भाजपच्या राज्य ओबीसीचे सेलचे समन्वयक डॉ. आशिष देशमुख यांनी तुपकर यांना ही ऑफर दिली आहे. “स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खदखद दिसून येत आहे. शेतकरी बहुजन नेत्यांवर अन्याय होत आहे. रविकांत तुपकर यांनी त्यांच्या पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी पक्ष संघटनेवर दावा करण्यापेक्षा भाजपमध्ये यावं. आम्ही त्याचं स्वागत करण्यासाठी तयार आहोत,” असं देशमुख म्हणाले.
Published on: Aug 04, 2023 01:22 PM
Latest Videos