राऊत कंस, त्यांना दुर्योधन काय कळणार? भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'संजय राऊत कंसांच्या भूमिकेत असल्याने त्यांना दुर्योधन काय समजणार? त्यांना धर्मराज्य काय समजणार?', असा टोला आशिष शेलार यांनी लगावला
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत कंसाच्या भूमिकेत असल्याने त्यांना दुर्योधन काय समजणार? त्यांना धर्मराज्य काय समजणार? ज्याची भूमिका कंसाची आहे, जो स्वतःच्या घराला आग लावतो,दुसऱ्याच्या घरालाही आग लावतो, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. मला वाटते संजय राऊत यांनी तालिबानमध्ये गेल्यावर नवीन कायद्याचे पुस्तक लिहिले आहे, करण तालिबान सारख्या सर्व नियमांचे ते समर्थन करतात, पण इथे तालिबानचा कायदा संजय राऊत चालणार नाही, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कायदा चालतो, आणि जर तुम्हाला आचरणात आणायचा असेल तर मी तुम्हाला पुस्तक पाठवीन. कोल्हापूर येथे सुरु असलेल्या शिवसेनेच्या आंदोलनावरही आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण ठाकरे गट ज्याप्रकारे राजकीय हेतूने केवळ एकाच व्यक्तीला बदनाम करण्याचे काम करत आहे, त्याला जनतेचा पाठिंबा नाही.