Video | आम्ही नसतो तर आदित्य पराभूत झाले असते, उद्धव ठाकरेंना कुणी सुनावलं...

Video | आम्ही नसतो तर आदित्य पराभूत झाले असते, उद्धव ठाकरेंना कुणी सुनावलं…

| Updated on: Sep 22, 2022 | 2:52 PM

भाजपची मतं नसती तर आदित्य ठाकरेंचा पराभव झाला असता. हिंमतीची भाषा करायची असेल तर आदित्य ठाकरेंनी स्वतः राजीनामा द्यावा आणि निवडणुकीचा सामना करावा, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय.

मुंबईः भाजपसोबत (BJP) लढले नसते तर आदित्य ठाकरेंचा मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असता, असं आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलंय. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपाला आणि अमित शहांना थेट आव्हान दिलं. काल गोरेगाव येथील गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र डागलं. हिंमत असेल तर एका महिन्यात महापालिका आणि लगेच विधानसभा निवडणुका घ्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, स्वतः मुख्यमंत्री असताना महापालिकेची निवडणूक पुढे का ढकलली? स्वतःच्या पायाखाली जळताना पळवाट का काढली? तुमचे सुपुत्रच मुळात आमच्या मतावर निवडून आले. भाजपची मतं नसती तर आदित्य ठाकरेंचा पराभव झाला असता. हिंमतीची भाषा करायची असेल तर आदित्य ठाकरेंनी स्वतः राजीनामा द्यावा आणि निवडणुकीचा सामना करावा, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय.

Published on: Sep 22, 2022 02:52 PM