नरेंद्र मोदी स्टेडिअममधील दुर्मिळ योग, शेलार-नार्वेकर-पवार यांचा एकत्र फोटो!
आयपीएलचा फायनल सामना आज नरेंद्र मोदी स्टेडिअममध्येच पार पडणार आहे. नेहमीप्रमाणे फायनल सामनाही संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होणार असून सात वाजता टॉस होणार आहे. हा सामना रविवारी होणार होता पण पावसामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला. त्यापुर्वीच नरेंद्र मोदी स्टेडिअममधून एक दुर्मिळ योग पाहायला मिळाला आहे.
अहमदाबाद : आयपीएलचा फायनल सामना आज नरेंद्र मोदी स्टेडिअममध्येच पार पडणार आहे. नेहमीप्रमाणे फायनल सामनाही संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होणार असून सात वाजता टॉस होणार आहे. हा सामना रविवारी होणार होता पण पावसामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला. त्यापुर्वीच नरेंद्र मोदी स्टेडिअममधून एक दुर्मिळ योग पाहायला मिळाला आहे. हा योग क्रिकेट आणि राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे. कारण नरेंद्र मोदी स्टेडिअममधला आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर आणि रोहित पवार यांचा एकत्रित फोटो समोर आला आहे. यावेळी MCA सचिव अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष संजय नाईकांनीही उपस्थिती होते. शेलार, नार्वेकर आणि रोहित पवार यांनी खास विमानानं एकत्र प्रवास करत या सामनासाठी अहमदाबादला आले आहेत.
Published on: May 29, 2023 03:11 PM
Latest Videos