सुप्रियाताई तुम्हाला मिळालेल्या पदाखाली सुरंग तर नाही ना?, भाजपच्या बड्या नेत्याचा टोला

“सुप्रियाताई तुम्हाला मिळालेल्या पदाखाली सुरंग तर नाही ना?”, भाजपच्या बड्या नेत्याचा टोला

| Updated on: Jun 23, 2023 | 2:11 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सत्तेतलंच कुणीतरी षडयंत्र रचतं आहे. त्यामुळेच त्यांचा सातत्याने अपमान केला जातो आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. यावर आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सत्तेतलंच कुणीतरी षडयंत्र रचतं आहे. त्यामुळेच त्यांचा सातत्याने अपमान केला जातो आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. यावर आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुप्रियाताईंनी अगोदर त्यांच्या पक्षाची चिंता करावी. आपल्या पक्षात मिळालेलं स्थान त्याखाली सुरुंग तर नाही ना याची चिंता करावी.त्ंयाना दिलेल्या राज्यात राष्ट्रवादी आहे का? हे मायक्रोस्कोप घेवून शोधावं आणि मग भाजप आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावर बोलण्याचा विचार करावा,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. “तसेच ज्या घटना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडत आहेत, त्या त्यांच्या अंतर्गत आहेत. खरंतर त्यावर आम्ही भाष्य करावं की नाही हा प्रश्न आहे. पण लांबून बघितल्यावर लक्षात येतं, ज्यावेळी शरद पवारांनी राजीनामा दिला, तेव्हा असलेले अजित पवार आणि बाकीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची वाक्य हे राष्ट्रवादीतील वाकयुद्ध होतं, ते वाकयुद्ध संपलं आणि आता वर्धापनदिनानिमित्त ज्या पद्धतीच्या भूमिका समोर येत आहेत. त्या राजीनामानाट्याच्या वाकयुद्धानंतर आता वर्धापनदिनी शीतयुद्ध सुरू झालं आहे. आता काही दिवसांनी टोळीयुद्ध सुद्धा दिसेल,” असंही आशिष शेलार म्हणाले.

Published on: Jun 23, 2023 02:11 PM