मोदींचा फोटो वापरून ज्यांनी मत मागितली, तेच लोक आता आम्हाला आव्हान देतात; भाजपचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
Ashish Shelar on Uddhav Thackeray : भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांच्या फोटोचाही दाखला देण्यात आला आहे. आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केलंय पाहा...
मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचाही संदर्भ दिला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मते मिळवली आणि नंतर गद्दारी केली. तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात? कोकणात शिमगा असल्याने जनता फारसे गांभीर्याने घेणार नाही. कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले. आधे इधर गए… आधे उधर गए.. अकेले “असरानी” बचगएं आता महाराष्ट्रात “असरानी” जिथे जिथे फिरतील तिथे तुफान मनोरंजन होणार…!”, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.
Published on: Mar 06, 2023 03:18 PM
Latest Videos