उद्धव ठाकरे यांची ओळख घरबशा मुख्यमंत्री,आदित्य ठाकरे सुद्धा...; भाजप नेत्याचा घणाघात

“उद्धव ठाकरे यांची ओळख घरबशा मुख्यमंत्री,आदित्य ठाकरे सुद्धा…”; भाजप नेत्याचा घणाघात

| Updated on: Aug 07, 2023 | 12:07 PM

माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. यानंतर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. यानंतर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांची वृत्ती सत्तेच्या गिधाडासारखी. उद्धव ठाकरे यांची ओळख घरबसा मुख्यमंत्री म्हणून झाली आहे, तर देवेंद्र फडणवीस परफॉर्मस करणारे नेते आहेत. ठाकरेंचा समावेश दगाबाजी करणाऱ्या नेत्यांच्या यादीत आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपची चिंता करू नये. सतत दुसऱ्यांच्या घरी वाकून बघू नका. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलगा मोदी यांच्या जीवावर निवडणून आले आहेत. त्यांचे फोटो वापरून आदित्य ठाकरे आमदार झाले.हिंदू एकत्र आले तर ठाकरेंना राग का आला?”

 

Published on: Aug 07, 2023 12:07 PM