Shiv Sena : शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपला हिनवलं, आशिष शेलार म्हणतात, आम्ही पेंग्वीन सेना म्हणू…
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपला कमळाबाई असं म्हणून हिणवण्यात आलं. यावरून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आक्रमक झालेत. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहेत. त्याठिकाणी भाजपनं जोरदार बॅनरबाजी केली आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपला कमळाबाई असं म्हणून हिणवण्यात आलं. यावरून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आक्रमक झालेत. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहेत. त्याठिकाणी भाजपनं जोरदार बॅनरबाजी केली आहे. त्यावरूनही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आशिष शेलार म्हणाले, तुम्ही कमळाबाई म्हटलं तर पेंग्वीन सेनेनंच आम्ही उल्लेख करू. त्याच्यापेक्षाही भयंकर शब्द आमच्या आणि आमच्या सहकाऱ्यांकडं आहेत. पडता भूई थोडी होईल. तोंड गप्प केलीत तर वाचालं एवढं स्पष्ट सांगतो. शिवसेनेतर्फे सांगण्यात आलं की, अल्प बुद्धी असली की असं वागतात. कमळाबाई आज म्हटलेलं नाही. वंदनीय शिवसेनाप्रमुखांची भाषण काढा. अमित शहा मुंबई दौऱ्यावर येण्यापूर्वी शिवसेना-भाजपमध्ये असा कलगीतुरा सुरू झालाय. शिवसेनेच्या मुखपत्रातून कमळाबाई आता हात घाईवर असा अग्रलेख लिहिण्यात आलाय. त्यामुळं भाजपही आक्रमक झाली.