मविआचं काम सुरुच, तुम्ही थोडं adjust केलं तर आणखी उत्तम होईल – Ashok Chavan on Devendra Fadnavis

| Updated on: Apr 03, 2022 | 5:01 PM

काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमाला खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी शिंदे आणि श्याम सुंदर शिंदे, भास्करराव पाटील खातगावकर, माजी मंत्री सूर्यंकांता पाटील आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते.

काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमाला खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी शिंदे आणि श्याम सुंदर शिंदे, माजी मंत्री सूर्यंकांता पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि भास्करराव पाटील खातगावकर उपस्थित होते. दिवंगत गंगाधरराव देशमुख यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री एकाच मंचावर आलेले आज पाहायला मिळाले. या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र भाऊ आमचं महा विकास आघाडीचं (MVA) काम उत्तम चाललंय, तुम्ही थोडं अ‌ॅडजस्ट करून घेतलं तर अजून उत्तम होईल, असा टोला अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

Published on: Apr 03, 2022 04:59 PM
अशोकराव आपला हा वैचारिक विरोध, शत्रुत्व नाही – Devendra Fadnavis
Thackeray Vs Pawar : ‘लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारलं ते राज ठाकरे यांना दिसलं नाही का?’