काँग्रेसमध्ये मी नाराज नाहीः अशोक चव्हाण

काँग्रेसमध्ये मी नाराज नाहीः अशोक चव्हाण

| Updated on: Sep 03, 2022 | 9:49 AM

दिल्लात महागाई विरोधात होणाऱ्या  आंदोलनासाठी मी आता दिल्लीला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राहुल गांधी यांची भारत जोडो ही जी यात्रा चालू आहे त्या कार्यक्रमाचे महाराष्ट्रातील नियोजित कार्यक्रमाची चर्चाही केली जाणार आहे ही माहिती त्यांनी यावेळी दिली. 

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे मात्र आज त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गणेशोत्सवाच्या काळात अशा राजकीय भेटीगाठी होत असतात, गणेशोत्सव कार्यक्रमाचे आपल्याला निमंत्रण आल्यामुळे मी त्यांची भेट घेतली होती, मात्र या भेटीत कोणतीह राजकीय चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपात जाणार असल्याच्या ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या चुकीच्या बातम्या असल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लात महागाई विरोधात होणाऱ्या  आंदोलनासाठी मी आता दिल्लीला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राहुल गांधी यांची भारत जोडो ही जी यात्रा चालू आहे त्या कार्यक्रमाचे महाराष्ट्रातील नियोजित कार्यक्रमाची चर्चाही केली जाणार आहे ही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Published on: Sep 03, 2022 09:48 AM