Ashok Chavan : अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीस भेट, राजकीय विषयावर चर्चा?
आधीही अशोक चव्हाण भाजपात (BJP) जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, अशोक चव्हाण यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. तर चव्हाण भाजपामध्ये येण्याच्या चर्चांवर भाजपाने सोयीस्कर मौन बाळगले होते.
मुंबई: काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) एकमेकांना भेटल्याची माहिती समोर येत आहे. हे दोन्ही नेते भाजपाचे प्रवक्ते आशिष कुलकर्णी यांच्या घरी भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाल्याचे सांगितले जात आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची आधीही चर्चा होती. कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी ते गेले होते. मात्र त्याचवेळी तेथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. दोन्ही नेते एकाचवेळी कुलकर्णी यांच्या घरी पोहोचल्याने चर्चांना उधाण आले आहे. आधीही अशोक चव्हाण भाजपात (BJP) जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, अशोक चव्हाण यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. तर चव्हाण भाजपामध्ये येण्याच्या चर्चांवर भाजपाने सोयीस्कर मौन बाळगले होते.

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं

कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप

Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?

प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
