नाव एकाकडे, पक्ष दुसऱ्याकडे असं होऊ शकतं? उद्धव ठाकरे यांच्या विधानावर कायदेतज्ज्ञ म्हणतात…
अमरावती येथे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देऊ शकते. पण, शिवसेना नाव नाही. कारण, शिवसेना हे नाव माझ्या आजोबा आणि वडिलांनी दिलंय. शिवसेना ही काय तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? असा सवाल करत थेट आव्हान दिलंय. यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे: अमरावती येथे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देऊ शकते. पण, शिवसेना नाव नाही. कारण, शिवसेना हे नाव माझ्या आजोबा आणि वडिलांनी दिलंय. शिवसेना ही काय तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? असा सवाल करत थेट आव्हान दिलंय. यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकाला चिन्ह आणि एकाला पक्षाचे नाव असं देता येणार नाही. उद्धव ठाकरे जसं म्हणालेत म्हणून तसं होऊ शकत नाही. निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेत असते. 31 तारखेला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीत हे स्पष्ट होणार आहे,” असं सरोदे म्हणाले.
Published on: Jul 11, 2023 11:18 AM
Latest Videos