असीम सरोदे यांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, एकनाथ शिंदे यांचं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी...

असीम सरोदे यांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी…”

| Updated on: Jul 05, 2023 | 8:48 AM

कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच असीम सरोदे यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यावरही भाष्य केलं आहे.

पुणे : कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच असीम सरोदे यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यावरही भाष्य केलं आहे. “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसल्याने हे सरकार अस्तित्वात आहे.काही दिवसातच एकनाथ शिंदे सह त्यांचे मंत्री व त्यांचे आमदार अपात्र ठरविण्यात येतील. एकनाथ शिंदे यांचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अजित दादांना अशा पद्धतीने पक्षासोबत घेण्यात आला आहे, असं दिसून येत आहे,” असं असीम सरोदे म्हणाले.

 

 

Published on: Jul 05, 2023 08:48 AM