अमरावती जिल्ह्यातील कांडली गावचे उपसरपंच गंगा धंडारेयांच्यावर प्राणघातक हल्ला
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडलीचे उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावर आता रात्री ११ वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई : 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या (Shiv jayanti) पार्श्वभूमीवर गावातील महिला सरपंचाशी विवाह (Marriage) केल्याने संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडलीचे उपसरपंच गंगा धंडारे यांच्यावर आता रात्री ११ वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आरोपी रोहित मरसकोल्हे याने हा प्राणघातक हल्ला केला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.या प्राणघातक हल्ल्यात उपसरपंच गंगा धंडारे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या अमरावती मधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र आरोपीने हल्ला का केला याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
Published on: Mar 07, 2022 11:05 AM
Latest Videos