आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा महाराष्ट्रात धडाका पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मेगा प्लान आखला आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी यांच्या १० सभा तर २० सभा या अमित शाहांच्या होणार आहेत. येत्या ८ नोव्हेंबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा राज्यभरात सुरू होणार आहे. चार दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ९ प्रचारसंभांचं नियोजन राज्यभरात करण्यात आलंय आहे. . पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा श्री गणेशा उत्तर महाराष्ट्रातून होणार असून ८ नोव्हेंबर रोजी मोदींची धुळे आणि नाशिकला सभा होईल. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी नांदेड, अकोला, चिमूर, १३ नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि १४ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई याठिकाणी मोदींच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या २२ सभा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ५०सभा होणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५० हून अधिक प्रचारसभा होणार आहेत.