मुश्रीफ यांच्यानंतर ईडीचा फेरा कोणा मागे? राष्ट्रवादीचा कोणता नेता अडकला जाळ्यात?, काय आहे कारण?
तर त्यांना चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहे. यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. याच्याआधी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना देखील ईडीची नोटीस गेली आहे.
मुंबई : गेल्या 9 महिन्यापासून प्रतिक्षेत असणाऱ्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर काही तासातच निकाल येण्याची शक्यता आहे. याच्याआधीच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) नॉट रिचेबल झाल्याने एकच खळबळ उडाली. याचदरम्यान आता दुसरा भूकंप राज्यात झाला आहे. सत्तासंघर्षाचा निकाल येण्याआधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीची नोटीस (ED) बजवाली आहे. तर त्यांना चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहे. यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. याच्याआधी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना देखील ईडीची नोटीस गेली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. यादरम्यानच आता आयएल आणि एफएस या प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. जयंत पाटील यांना आलेल्या ईडी नोटीसमुळे विविध चर्चा रंगल्या आहेत. जयंत पाटील यांना जाणीवपूर्वक ही नोटीस बजावण्यात आली आहे अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगली आहे. आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याप्रकरणात अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.