कल्याणमध्ये पुन्हा बॅनरबाजी; थेट पालकमंत्रीच यांचा फोटो लावत लिहलं, ‘हरवलेत आपण यांना पाहिलं आहे का?’

कल्याणमध्ये पुन्हा बॅनरबाजी; थेट पालकमंत्रीच यांचा फोटो लावत लिहलं, ‘हरवलेत आपण यांना पाहिलं आहे का?’

| Updated on: Jun 17, 2023 | 11:23 AM

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांना घेरण्यात आलं होतं. तेथे ठाकरे गट आणि मनसेकडून ‘पालकमंत्री हरवले आहेत! आपण त्यांना पाहिलंत का?’ अशी फलकबाजी शहरात करण्यात आली होती.

कल्याण : काही दिवसांपासून कल्याणमध्ये बॅनरबाजीला उत आला आहे. येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरून बॅनरबाजी करण्यात आली होती. हा वाद चांगलाच भडकला होता. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांना घेरण्यात आलं होतं. तेथे ठाकरे गट आणि मनसेकडून ‘पालकमंत्री हरवले आहेत! आपण त्यांना पाहिलंत का?’ अशी फलकबाजी शहरात करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यावर पालकमंत्री शंभूराजे देसाई याचा फोटो लावत हरवले आहेत, आपण यांना पाहिलं आहे का? अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला आहे. तर याचं बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावला आहे. तर फडणवीस साहेब आपले ऐतिहासिक कल्याण नगरीत स्वागत…पण येताना पालकमंत्री देसाई यांना आपल्या सोबत घेवून या, अशी विनंती करण्यात आली आहे. 19 तारखेला फडणवीस यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळं काय लिहलंय बॅनरवर पहा…

Published on: Jun 17, 2023 11:17 AM