Monsoon Update : अखेर चिंता मिटलीच; कधी होणार मान्सुन सक्रीय? अंदाज सांगितला मच्छिमारानं
कोकण किनारपट्टीवर मान्सुन सक्रीय होण्याच्या दृष्ट्रीने बद होवू लागले आहेत. याच बदलांवर इथला मच्छिमार मान्सुन आणि पावसाची गणिते आखत असतो. मान्सुन महाराष्ट्रात कधी सक्रीय होणार याचा अंदाज हवामान खातं बांधतय.
रत्नागिरी : मान्सुनची वाट सर्वच जण चातका प्रमाणे पहातायत. त्याबाबत हवामान विभागाकडून योग्य ती माहिती आपल्याला मिळत असतेच पण जर कोण ही माहितीच आपल्याला निसर्गच आणि समुद्रच देतो असे म्हणाला तर तुम्ही काय म्हणाल? पण हे वक्तव्य केलं आहे स्थानिक मच्छिमार संदेश शिवलकर यांनी. जे हवामान जाणकार सुद्धा आहेत. त्यांनी कोकण किनारपट्टीवर मान्सुन सक्रीय होण्याच्या दृष्ट्रीने बद होवू लागले आहेत. याच बदलांवर इथला मच्छिमार मान्सुन आणि पावसाची गणिते आखत असतो. मान्सुन महाराष्ट्रात कधी सक्रीय होणार याचा अंदाज हवामान खातं बांधतय. पण मान्सुन सक्रीय कधी होणार पाऊस कधी येणार याचे अचुक ठोकताळे किनारपट्टीवरचा मच्छिमार सुद्धा बांधत असतो. सध्या कोकण किनारपट्टीवर सध्या निसर्ग बदललाय सुरवात झालीय. त्यामुळे मान्सुन सक्रीय होणार आहे याची दस्तक निसर्ग देवू लागलाय. किनारपट्टी भागात माती मिश्रित फेणी म्हणजे फेसाचे पाणी येवू लागलंय. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर ही फेणी रत्नागिरीच्या किनाऱ्यावर पहायला मिळतेय. तर दक्षिणेकडून वाऱ्याचे प्रमाण देखिल वाढलंय. याच गणितांच्या आधारावर मान्सुन 4 ते 5 दिवसात सक्रीय होईल अशी गणित मच्छिमार संदेश शिवलकर यांनी बांधतायत.