मंत्रीमंडळ विस्ताराच्या तोंडावर रामदास आठवले यांची भाजपकडे मोठी मागणी; म्हणाले...

मंत्रीमंडळ विस्ताराच्या तोंडावर रामदास आठवले यांची भाजपकडे मोठी मागणी; म्हणाले…

| Updated on: Jul 12, 2023 | 7:30 AM

याचदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोमवारी मध्यरात्री खतबत रंगली होती. तर आताही भाजपच्या कोट्यातील काही मंत्रिपद ही अजित पवार गटाला देण्यात येणार असे कळत आहे.

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच्याआधी खाते वाटपासह तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोमवारी मध्यरात्री खतबत रंगली होती. तर आताही भाजपच्या कोट्यातील काही मंत्रिपद ही अजित पवार गटाला देण्यात येणार असे कळत आहे. मात्र आता यावरून शिंदे गटासह भाजपमधील आमदारांमध्ये नाराजी दिसत आहे. असे असतानाच आता मंत्रिमंडळ विस्तारावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडे मोठी मागणी केली आहे. आठवले यांनी मंत्रीमंडळ विस्तारात RPI ला एक मंत्रिपद आणि राज्यपाल नामनिर्देशित 12 सदस्यांमध्ये RPI च्या एका सदस्याची वर्णी लावावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेची आठवन करून देताना आम्हाला 7 MLC मिळत होत्या असं म्हटलं आहे.

Published on: Jul 12, 2023 07:30 AM