...तर भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला होणारच : नितेश राणे

…तर भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला होणारच : नितेश राणे

| Updated on: Oct 19, 2022 | 11:55 AM

भास्कर जाधव यांच्या घरावर कोणी हल्ला केला याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

चिपळूण : भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav) हे सगळीकडे तोंड फुटल्यासारखं बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पातळी सोडून बोलायला लागले तर त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर होणारच. कोणावर टीका करायची असेल तर ती फक्त राजकारणापूर्तीच करा पण खालच्या पातळीवर जाऊन बोलाल तर कार्यकर्ते रिअॅक्शन देणारच. भास्कर जाधव यांना बोलण्याची सवय आहे तर त्यांनी ह्या देखील गोष्टी सहन करण्याची सवय ठेवली पाहिजे. अशी प्रतिक्रिया नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिली आहे.

Published on: Oct 19, 2022 11:47 AM