सोलापुरात चोरट्यांचा डाव फसला? बँकेतील ड्रॉवर तपासले, तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र… घटना CCtv त कैद
येथील मंगळवार पेठ परिसरात असणारी महावीर अर्बन बँक फोडून चोरट्यांचा लॉकर तोडण्याचा प्रयत्न फसल्याने अनेकांच्या मौल्यवान वस्तू वाचल्या आहेत. तर बँक फोडीची ही घटना CCtv कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सोलापूर, 13 ऑगस्ट 2023 | सोलापूरात मोठी घटना समोर आली असून त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. येथील मंगळवार पेठ परिसरात असणारी महावीर अर्बन बँक फोडून चोरट्यांचा लॉकर तोडण्याचा प्रयत्न फसल्याने अनेकांच्या मौल्यवान वस्तू वाचल्या आहेत. तर बँक फोडीची ही घटना CCtv कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष बाब म्हणजे बँकेतील तीन दरवाजे तोडून चोरट्यांच्या हातात काहीच लागले नाही. यानंतर चोरांनी आपला मोर्चा बँकेच्या लॉकरकडे वळवले आणि तो फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोलापूर शहराची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या मंगळवार पेठ परिसरात महावीर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आहे. येथे गुरुवारी रात्री चोरट्यांनी हाथ साफ करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा तो प्रयत्न फसला. गुरुवारी रात्री चोरट्यांनी तीन दरवाजे तोडून बँकेत प्रवेश केला. मात्र लॉकर तोडता न आल्याने बँकेतील जवळपास पाच कोटींची कॅश वाचली आहे. ही घटना आणि बँक फोडणाऱ्या दोन चोरट्यांची छायाचित्रे सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. विशेष म्हणजे रात्री 8:30 वाजता दोन चोरट्यांनी हातात रॉड आणि टॉर्च घेऊन तीन दरवाजे तोडत बँकेमध्ये प्रवेश केला. बँकेतील ड्रॉवर तपासले मात्र हाती काही लागले नाही. त्यावेळी बँकेची मुख्य तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये ते अयशस्वी झाले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस येताच बँकेने याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास आता सुरू आहे.