धक्कादायक! नैसर्गिक विधीसाठी गेलेली अल्पवयीन मुलगी परतली नाही, नेमकं काय घडलं? ग्रामस्थ आक्रमक
जिल्ह्यातील एरंडोल व भडगाव तालुक्यातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार पारोळा तालुक्यात समोर आला.
जळगाव, 12 ऑगस्ट 2023 | जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामुळे ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाल्याचे तर त्यांच्याकडून ठिय्या आंदोलन केले जात गेले. तर त्यांची पोलीसांकडून समजूत काढताना दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. घडलेल्या या घटनेमुळे सध्या जळगावच्या पारोळा तालुक्यात प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झालेचे समोर आले आहे. तर त्या अल्पवयीन मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात असून संशयीतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यातील एरंडोल व भडगाव तालुक्यातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार पारोळा तालुक्यात समोर आला. तालुक्यातील एका गावात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणांने लैंगिक अत्याचार केला. तर मुलीच्या डोक्यावर दगड मारून व दोरीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित तरुण बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याचे विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला तात्काळ अटक करून फाशी द्यावी या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलीस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन केले आहे. दरम्यान पोलिसांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.