जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी होणारा प्रयत्न हा खरा राष्ट्रविरोधी – बाळासाहेब थोरात
ज्यावेळी राज्यातील जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी होणारा प्रयत्न हा खरा तर राष्ट्राच्या विरोधात आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
अहमदनगर – राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये राज्य सरकाराचे (state Government)काहीतरी म्हणणं असेल ते योग्य पद्धतीन न्यायालयात मांडल जाईल. मात्र या सगळ्या पेक्षा मुख्यमंत्र्यांच्या घरासोमर जाऊन तिथे हनुमान चालिसा (Hanuman Chalisa)म्हणण्याचा प्रकार फार दुर्दैवी आहे . महाराष्ट्रात अशांतता कशे निर्माण होईल यासाठी केलेला तो प्रयत्न आहे. ज्यावेळी राज्यातील जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी होणारा प्रयत्न हा खरा तर राष्ट्राच्या विरोधात आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat)यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
Published on: May 07, 2022 05:29 PM
Latest Videos