Sachin Sawant | सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा
सावंत यांनी सातत्याने भाजपला अंगावर घेतले होते. काँग्रेसची नेमकी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि भाजपला सडेतोड उत्तर देण्याचं कामही ते करत होते. शिवाय पक्ष चर्चेत ठेवण्याचंही काम त्यांनी केलं होतं. मात्र, आज झालेल्या नियुक्त्यांमध्ये त्यांना डावलून अतूल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आलं. त्यामुळे सावंत नाराज झाले असून या नाराजीतूनच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्यांवर नाराज होऊन काँग्रेस अध्यक्ष सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. अतुल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद दिल्याने सचिन सावंत यांनी राजीनामा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सचिन सावंत हे गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. मधल्या काळात त्यांना विधानपरिषदेवरही पाठवणार असल्याची चर्चा होती. सावंत यांनी सातत्याने भाजपला अंगावर घेतले होते. काँग्रेसची नेमकी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि भाजपला सडेतोड उत्तर देण्याचं कामही ते करत होते. शिवाय पक्ष चर्चेत ठेवण्याचंही काम त्यांनी केलं होतं. मात्र, आज झालेल्या नियुक्त्यांमध्ये त्यांना डावलून अतूल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आलं. त्यामुळे सावंत नाराज झाले असून या नाराजीतूनच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. सावंत यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस हायकमांडला पाठवल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची व डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या कामात सुसुत्रता व वेग यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची रचना करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप केले आहे.