Special Report | राज्यपाल कोश्यारींची ऑडिओ क्लिप व्हायरल

Special Report | राज्यपाल कोश्यारींची ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Aug 01, 2022 | 11:33 PM

विशेष म्हणजे फोन करणाऱ्या व्यक्तीनं भविष्यात असं विधान करु नका, असं म्हटल्यानंतर ''हम हीं चले जायेंगे'' असंही या फोनकॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हटले आहेत. सर्वपक्षियांनी राज्यपालांच्या त्या विधानाचा विरोध केला होता.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी(Governor Bhagat Singh Koshyari) महाराष्ट्राचा अपमान केला नसल्याचा दावा नितेश राणेंनी केला होता. मात्र त्यानंतर व्हायरल झालेल्या एका फोनक्लिपमध्ये खुद्द राज्यपालांनीच ते विधान चूक असल्याचं मान्य केलंय. जर मुंबईत गुजराती आणि राजस्थानी नसते, तर मुंबईकडे पैसे राहिले नसते आणि मुंबई आर्थिक राजधानी होऊ शकली नसती. असं राज्यपाल म्हटले होते. त्यावरुन मोठा हल्लकल्लोळही झाला आणि एका व्यक्तीनं राज्यपालांना फोनकरुन त्याबद्दल विचारणा केली. विशेष म्हणजे फोन करणाऱ्या व्यक्तीनं भविष्यात असं विधान करु नका, असं म्हटल्यानंतर ”हम हीं चले जायेंगे” असंही या फोनकॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हटले आहेत. सर्वपक्षियांनी राज्यपालांच्या त्या विधानाचा विरोध केला होता. भाजपनंही राज्यपालांच्या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटलं होतं. मात्र एकट्या नितेश राणेंनी राज्यपालांच्या विधानाचं समर्थन केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता ते विधानाबद्दल खुद्द राज्यपालांनीच चुकीची कबुली दिलीय.

Published on: Aug 01, 2022 11:33 PM