Aurangabad Ambadas Danve| न्यायदेवतेकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा

Aurangabad Ambadas Danve| न्यायदेवतेकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा

| Updated on: Jul 20, 2022 | 1:25 PM

एकनाथ शिंदे यांना अंबादास दानवे यांचा खोचक टोला

आमची बाजू आज न्यायालयात आज ठाम पणे मांडली आहे, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे, पक्षाचा आणि पक्षानेतृत्वाचा मुद्दा प्रामुख्याने मुद्दा मांडला पण विरोधकांनी रस्ता भटकवण्याच्या मुद्दे मांडले गेले मात्र तरीही आम्हाला न्याय मिळेल. एकनाथ शिंदे गटाने पक्ष सोडला नसला तरी वेगळा गट निर्माण केला आहे पण त्यांना आता कोणत्या तरी गटात जावे लागेल खुर्च्या वाचवण्यासाठी पळवाटा शोधत आहेत. उध्दव ठाकरे सांगतील तोच पक्ष आहे, शिंदे सांगतील तो पक्ष नाही. 16 आमदारांची अपत्रता झाली तरी एकनाथ शिंदे हे 16 आमदारात आहेत. त्यामुळे त्यांचा पद जाऊ शकतं विधानसभा अध्यक्ष निवडणूक रद्द होऊ शकते. शिवसेनेवर दावा कुणीही सांगू शकत नाही कारण शिवसेनेची घटना वेगळी आहे, त्यांनी स्वतःला पक्षप्रमुख सांगितलं नाही नेता सांगितलं आहे पण नेते पदावरून त्यांना काढलं आहे. उद्या एखाद्या गावातला कुणीही व्यक्ती उठेल आणि म्हणेल की मी शिकसैनिक आहे आणि मी नियुक्त्या करतो त्याला काहीही अर्थ नाही. एकनाथ शिंदे यांना अंबादास दानवे यांचा खोचक टोला

Published on: Jul 20, 2022 01:25 PM